English
मंडळाची माहिती
भक्तिभावा बरोबरच राष्ट्रीय द्दष्ट्या जनजागृतीचे स्वरुप गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी दिले. त्यांच्याच प्रेरणेने १९६० साली प्रत्येकी चार आणे वर्गणी काढून सांवत आळीतील ४-५ मुले उत्सव करण्यासाठी एकञ आली. त्यावेळेला त्यांच्याकडे काय होते? काही नाही. होती तर दुर्दम्य इच्छाशक्ती! आणि काही तरी करावयाचे ही तळमळ. आई-वडीलांची परवानगी मागितली आणि त्यांनी ती आनंदाने दिली. सर्वांना आनंद झाला आणि जिद्द वाढली. श्री गणरायाचे नाव घेतले आणि दरवर्षी नेटाने उत्सव साजरा करु लागले.
१९७० साल उजाडले, मुले थोडी मोठी झाली. त्यांनी आजुबाजुच्या सवंगड्यांना हाक दिली, करारे-हाकारे-पुकारे दिंडोरीचा नारा घुमु लागला. गणेशोत्सवासाठी सगळे एकञ झाले. गणेशोत्सव मंडळ स्थापन झाले होतेच, त्याला थोडे मूर्त स्वरुप आले. सर्वजण आणखीन जवळ आले, कळकळीने काम करू लागले. बिंदूतून सागर होतो! कामातून दाम निघतो! आणि प्रामाणिक कार्यातून संघटनेत एकी होते. जोतो प्रेमाने गणेशोत्सवासाचे काम करू लागला आणि अश्याप्रकारे दरवर्षी उत्साहात उत्सव साजरा होउ लागला. ह्या मंडळाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तरूणाइचा तडफदारपणा, ज्येष्ट लोकांचे मार्गदर्शन ह्यांचा उत्तम संगम. कितीहि मोठा पदाधिकारी असला तरी इथे मंडळाचा सामान्य कार्यकर्ता म्हणुनच वावरणार.
मागील काही वर्षात अनेक अडचणी आल्या पण मंडळाने जोमाने उत्सव साजरा केला आणि हया पुढेही 'श्री'च्या क‌ृपेने तो अखंड चालू राहील.